‘आहुति’चा दीपावली विशेषांक शक्तीपीठ विशेषांक !

 ‘आहुति’चा दीपावली विशेषांक शक्तीपीठ विशेषांक !

ठाणे दि १९ : अंबरनाथ येथून गेल्या ६० वर्षांपासून अविरत, अव्याहतपणे प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक आहुतिचा यंदाचा दीपावली विशेषांक २०२५ हा शक्तीपीठ विशेषांक आहे. या ‘आहुति’च्या ५९ व्या दीपावली विशेषांकाचे प्रकाशन अंबरनाथ येथील सूर्योदय सभागृहात शुक्रवारी निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत झाले.

अतिथी संपादक डॉ. पूर्वा अष्टपुत्रे, अंबरनाथ जयहिंद को. ऑप. बँकेच्या संचालक सौ. रूपा देसाई जगताप, सूर्योदय सोसायटीच्या अध्यक्ष शोभा शेट्टी, श्री गजानन महाराज सेवा मंडळाच्या अध्यक्ष आशा दलाल, उपाध्यक्ष संध्या म्हात्रे, प्रतिभा मोरे, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा भगवान चक्रदेव, विजय बर्वे, चित्रकार अनिल डावरे, लेखक प्रशांत असलेकर, ‘आहुति’चे सल्लागार योगेश त्रिवेदी, संपादक गिरीश त्रिवेदी, कार्यकारी संपादक मनीषा त्रिवेदी, दीपक रेवणकर, पत्रकार प्रशांत मोरे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

यंदाच्या विशेषांकात स्त्री शक्तीपीठे अर्थात सकारात्मक आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या वैयक्तिक आणि सामूहिक यशोगाथांचा समावेश आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *