वायू प्रदुषणात दिवाळी फटाक्यांची भर

 वायू प्रदुषणात दिवाळी फटाक्यांची भर

अकोला, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महापालिका क्षेत्रात वायू प्रदुषणाचे संकट वाढले आहे.वाढत्या वायू प्रदुषणामुळे शहरातील हवेची गुणवत्ता वाईट झाली आहे. न्यायालयाने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारपणे वागण्याचे निर्देश दिले होते.. Diwali firecrackers contribute to air pollution

मात्र काल लक्ष्मीपूजन निमित्त शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली याचा मोठा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर झाला आहे, राज्यात सर्वात अधिक प्रदूषित शहरात अकोल्याची नोंद झाली आहे..

वाढत्या वायू प्रदुषणामुळे शहरातील हवेची गुणवत्ता वाईट झाली आहे. परिणामी नागरिकांना श्वसनाचे त्रास सुद्धा होऊ लागले आहेत.
वायू प्रदुषणाच्या बाबतीत अकोला शहर हे राज्यातील टॉप १५ शहरांमध्ये असून उच्‍च न्‍यायालयाने महापालिकेला उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

ML/KA/PGB
13 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *