गाय वासराला ओवाळून दिवाळीला सुरुवात

 गाय वासराला ओवाळून दिवाळीला सुरुवात

छ संभाजी नगर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज वसुबारस आज पासुन दिवाळीची सुरवात होते मात्र आज ही सुरवात गाय आणि वासराला ओवाळून केली जाते. त्यासाठी सुवासिनींनी गाय वासरला ओवाळणी करून गोड धोड खायला घातले.

आज बाजरीला ही महत्त्व असून बाजरीच्या पिठाचे दिवे करून त्या दिव्याने गाय आणि वासराचे औक्षण केले जाते . आता ही परंपरा फक्त गाव, खेड्या मधेच सुरू असल्याचे दिसून येते. Diwali begins by waving the cow and calf

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील हट्टी येथील महिलानी ही परंपरा अजूनही टिकून ठेवल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागात ठीक ठिकाणी आज वसुबारस निमित्त सर्वत्र गाय वासरांचे पूजन करण्यात आले.

ML/KA/PGB
9 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *