पूरग्रस्तांच्या सोबत दिवाळी साजरी ; राष्ट्र सेवा दलाचा उपक्रम.

 पूरग्रस्तांच्या सोबत दिवाळी साजरी ; राष्ट्र सेवा दलाचा उपक्रम.

मुंबई, दि.१९ : राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी यंदाची दिवाळी ही अतिवृष्टी/पूरग्रस्त भागातील लोकांसोबत साजरी करुन त्यांना आनंद, सुख समृद्धी समाधान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.
मुक्काम : सीना दारफळ , तालुका : माढा, जिल्हा सोलापूर, कुर्डुवाडी पासून पंचवीसेक किलोमीटर अंतरावर असलेल्या सीना दारफळ या पूरग्रस्त गावात राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांचा मुक्काम होता.

महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते दारफळ या पूरग्रस्त गावात शाळेतील मुलांशी संवाद साधत त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करीत होते. त्याच बरोबर घराघरात जाऊन फराळ वाटत असतांना घरातील माणसांशी संवाद साधत आहेत. प्रश्न समजून घेत आहेत. त्याच्या दोन दिवस अगोदर परांडा तालुक्यात जनावरांना चारा देऊन कार्यकर्ते आले होते. राष्ट्र सेवा दलाने आपल्या घरातील फराळ आमच्याजवळ द्यावा असे आवाहन केले होते. त्यालाही प्रतिसाद मिळाला. तो फराळ घेऊन राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते दारफळ मध्ये पोहोचले.

वसु बारस या दिवाळीच्या पहिल्या दिवशी शाळेतील मुले आणि त्यांच्या पालकांसोबत संगीतमय दिवाळी साजरी करून त्यांना तणावमुक्त करण्याचा प्रयत्न केला आणि धन त्रयोदशी या दुसऱ्या दिवशी फराळ वाटपाचा आणि घराघरात जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. शाळेला लागूनच सीना नदी आहे. या नदीच्या पैलतीरावर असलेल्या बरड वस्तीला पुरात मोठे नुकसान सोसावे लागले. तेथे कार्यकर्ते प्रत्यक्ष घरी जाऊन फराळ देवून त्यांना दुःखात उभारी देण्यासाठी एक प्रयत्न केला.

यावेळी कल्याण डोंबिवलीचे सुहास कोते, जीवराज सावंत, , नाशिकचे वसंत एकबोटे, पुण्यातून संजय गायकवाड, शरद भोसले, दिपाली आपटे, शीबा गायकवाड, संगमनेरहून राजा अवसक, सुखदेव इल्हे, इचलकरंजीतून संजय रेंदाळकर, रोहित दळवी, मुस्तफा शिकलगार, आरिफ पानारी, वैभवी आढाव, अफझल मुजावर सांगलीचे रोहित शिंदे, हेरंब माळी, कराडच्या दिपाली कांबळे, परांडा येथील घोगरे गुरुजी, सासवडचे देवा भालेराव आणि सहकारी सहभागी झाले होते. केवळ मदत पाठवून न थांबता दिवाळीचे दोन दिवस पूरग्रस्तांच्या सोबत राहून कार्यकर्ते परतीच्या प्रवासाला निघाले.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *