दिव्यांग दृष्टीहीन बांधवांची पंढरपूर वारी परतली

यवतमाळ दि. २०–
यवतमाळ येथील सेवा समर्पण प्रतिष्ठान तर्फे दिव्यांग दृष्टीहीन कलावंत मुलामुलींची पंढरपूर वारी आयोजित करण्यात आली होती . ही वारी तब्बल साडेपाचशे किलोमीटर पायी चालून नुकतीच सुखरूप परत आली आहे.
याबाबत संपूर्ण वारकऱ्यांचा यवतमाळ शहरवासियांतर्फे कौतुक सोहळा आयोजत करण्यात आला होता. सर्व वारकऱ्यांचा निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना दृष्टीहीन वारकरी सोनम ठाकरे हिने, नियतीने आमचे पंख छाटले तरी तुमच्या प्रेम रूपी पंखाने आम्ही उंच उंच भरारी घेऊ असे विचार व्यक्त केले. ML/ML/MS