‘कोमसाप’चे जिल्हा साहित्य संमेलन 30 जुलै रोजी ठाण्यात!

 ‘कोमसाप’चे जिल्हा साहित्य संमेलन 30 जुलै रोजी ठाण्यात!

ठाणे, दि. २९(एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात ‘कोमसाप’चे जिल्हा साहित्य संमेलन यंदा 30 जुलै रोजी ठाणे येथील आनंद विश्व गुरूकुल विधी महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. कोकण मराठी साहित्य परिषद, आनंद विश्व गुरूकुल, शारदा एज्युकेशन ट्रस्ट, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात परिसंवाद, कवी संमेलन, अभिवाचन आदी सत्रांतून ठाणेकरांना साहित्यिक मेजवानी मिळणार आहे.

या संमेलनाची सर्व नियोजन झाले असून रविवारी या संमेलनाच्या माध्यमातून ठाणेकर साहित्यप्रेमींना साहित्यजागर अनुभवता येणार आहे, असे कोमसापचे ठाणे जिल्हाध्यक्ष कवी बाळ कांदळकर यांनी सांगितले.

कोकण मराठी साहित्य परिषद गेल्या तीन दशकांपासून मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यरत आहे. कोमसापकडून दरवर्षी भरवण्यात येणारे जिल्हा साहित्य संमेलन यंदा ठाणे येथील आनंद विश्व गुरूकुल विधी महाविद्यालयातील जनकवी पी. सावळाराम सभागृहात सकाळी 9:30 ते सायंकाळी 7 या वेळेत संपन्न होणार आहे.

साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस हे या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवणार असून संमेलनाचे स्वागताध्यक्ष अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी असणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक व कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची या संमेलनाला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या साहित्य संमेलनातून आजचे साहित्य संवेदन टिपणारी आणि लिहित्या हातांना अभिव्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारी सत्रे होणार आहेत, अशी माहिती कोमसापचे ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर यांनी दिली.

………………………………

संमेलनातील सत्रे :

सकाळी 9:30 वाजता – उद्घाटन समारंभ
उपस्थिती – ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, संमेलनाध्यक्ष राजन गवस, कोमसाप केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, कोमसाप केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त व गझलकार संदीप माळवी, ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत, शारदा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष विलास ठुसे, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे विलास जोशी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुनील चौधरी, कोमसाप ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर

सकाळी 11 वाजता – परिसंवाद : समाजमाध्यमांवर प्रसारित होणारे साहित्य आणि त्याची प्रगल्भता

वक्ते – अतुल कुलकर्णी (कार्यकारी संपादक, लोकमत), श्रीकांत बोजेवार (निवासी संपादक, महाराष्ट्र टाइम्स), विवेक गिरधारी (कार्यकारी संपादक, पुढारी), नंदकुमार शिंदे (अभ्यासक)
सूत्रसंचालन – प्रा. दीपा ठाणेकर (युवाशक्ती प्रमुख, कोमसाप)

दुपारी 2.15 वाजता – अभिवाचन सत्र

सहभाग – विविध सन्माननीय अभिवाचनकर्ते
उद्धाटक – प्रा. विजय जोशी (ज्येष्ठ दिग्दर्शक)
अध्यक्ष- किरण येले (कवी, कथाकार)
सूत्रसंचालन – अजित महाडकर, मयुरी कदम, संध्या लगड

दुपारी 2.15 वाजता – निमंत्रितांचे कवी संमेलन

उद्धाटक- प्रा. अशोक बागवे (ज्येष्ठ कवी)
अध्यक्ष- लोकनाथ यशवंत (ज्येष्ठ कवी)
सूत्रसंचालन – नीतल वढावकर, प्रा. मनीषा राजपूत

दुपारी 2.15 वाजता – खुले काव्यवाचन सत्र 1

अध्यक्ष- आरती कुलकर्णी (ज्येष्ठ कवयित्री)
उद्धाटक- संदीप माळवी (ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त, गझलकार)
प्रमुख पाहुणे- विकास भावे (ज्येष्ठ कवी)
सूत्रसंचालन – मनिषा चव्हाण, मनमोहन रोगे

दुपारी 3.15 वाजता – खुले काव्यवाचन सत्र 2

अध्यक्ष – कॅ. वैभव दळवी (ज्येष्ठ कवी)
उद्घाटक – संदीप माळवी (ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त, गझलकार)
प्रमुख पाहुणे – डॉ. प्रतिभा भिडे (साहित्यिक)
सूत्रसंचालन – डॉ. प्रतीक्षा बोर्डे, निशिकांत महांकाळ
मुख्य समन्वयक – विनोद पितळे

सायंकाळी 5.30 वाजता – संमेलन सांगता समारोह

उपस्थिती – संमेलनाध्यक्ष राजन गवस आणि अन्य मान्यवर

ML/KA/SL

29 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *