उशिराने होणाऱ्या जन्ममृत्यू नोंदींचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विविध कारणांमुळे होणाऱ्या विलंबामुळे उशिराने करायच्या जन्म मृत्यू नोंदीसाठी सरकारने नवीन तरतूद केली असून, त्यानुसार एक वर्षाहून अधिक काळ विलंब झाला आहे त्यांची नोंदणी जिल्हाधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यांना याबाबत नोंद करून संबंधित दाखले देण्याची ही नवी पद्धत लागू करण्यात आली आहे. यामुळे अशा नोंदणी करण्यासाठी दिलेली स्थगिती उठवण्यात आली आहे, ही नोंदणी करणे यानुसार सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात एका निवेदनाद्वारे दिली.
यापूर्वी अशी नोंद प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अर्थात कनिष्ठ न्यायालय यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावी लागत होती, त्यात आता बदल करण्यात आला आहे. आता हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून, त्यांनी प्राधिकृत केलेल्या उपविभागीय अधिकारी आणि तहसीदार यांना हे अधिकारी प्राप्त होतील, त्यामुळे जनतेला कमी खर्चात आणि वेळेत आता उशिराने करायच्या नोंदी करणे शक्य होणार आहे.
ML/ ML/ SL
13 March 2025