दादर फुलबाजार व दादर फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप

 दादर फुलबाजार व दादर फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दादर जुना फुल बाजार व दादर कट फ्लावर्स असोसिएशनतर्फे चैत्यभूमीकडे येणाऱ्या- जाणाऱ्या अनुयायांना अल्पोहार वाटप करण्यात आले. गेली तब्बल १२ वर्षे सुरू असलेल्या या उपक्रमात यंदा सुमारे ५ हजार वडापाव वाटप करण्यात आले.

यावर्षी प्रथमच केशवसुत उड्डाणपुलाखाली फुल-हार विक्री करणाऱ्या महिलांकडून पाणी वाटपाचीही व्यवस्था करण्यात आली. अनुयायांच्या सोयीसाठी केलेल्या या सेवाकार्यात स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

या उपक्रमाचे मुख्य आयोजक सोपान शेठ दुराफे, अभिजित दुर्वे, विनोद केदार, गजानन गावडे, गणेश मोकल, दीपेन सयानी यांच्यासह असोसिएशनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त समाजसेवेचे व मानवी मूल्यांचे दर्शन घडविणारा हा उपक्रम अनुकरणीय ठरला.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *