शोभा बच्छाव यांच्याविरोधात काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य

 शोभा बच्छाव यांच्याविरोधात काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य

धुळे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :धुळे लोकसभेसाठी काँग्रेसतर्फे माजी मंत्री शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीनाट्य उफाळून आले असून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी आपल्या धुळे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे त्यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी देखील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, दोन दिवसात उमेदवार बदला अन्यथा वेगळी भूमिका घेऊ असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी पक्षश्रेष्ठींना दिला आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असताना आमची उमेदवारी का डावलण्यात आली याचं स्पष्टीकरण देखील पक्षश्रेष्ठींनी द्यावे असे मत शामकांत सनेर यांनी व्यक्त करत कार्यकर्त्यांशी बैठक घेतली आहे, यावेळी कार्यकर्त्यांनी श्यामकाम सनेर यांना उमेदवारी न देता जिल्हा बाहेरील उमेदवार का दिला यावर नाराजी व्यक्त केली आहे. Displeasure in Congress against Shobha Bachhav

ML/ML/PGB
11 Apr 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *