दिशा सालियन ने आत्महत्याच केली, बलात्कार नाहीच, पोलिसांची भूमिका

 दिशा सालियन ने आत्महत्याच केली, बलात्कार नाहीच, पोलिसांची भूमिका

मुंबई, दि. ३ : मुंबई उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात, मुंबई पोलिसांनी दिशा सालियनचा मृत्यू आत्महत्याने झाल्याचा आपला पवित्रा पुन्हा एकदा स्पष्ट केला आणि बलात्कार किंवा हत्येचे सर्व आरोप फेटाळून लावले. एसआयटीविरुद्ध सीबीआय चौकशी आणि एफआयआर मागण्याची याचिका फेटाळण्याची मागणी पोलिसांनी केली.
त्यांनी असे नमूद केले:

  • पोस्टमार्टममध्ये हल्ल्याचे कोणतेही चिन्ह नाहीत
  • कोणतेही संशयास्पद सीसीटीव्ही किंवा कॉल रेकॉर्ड नाहीत
  • त्या रात्री उपस्थित असलेल्या सर्व मैत्रिणींचे जबाब
  • फॉरेन्सिक अहवालात ती खूप मद्यधुंद असल्याचे सिद्ध झाले

दरम्यान दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस दिशाचा अपघाती मृत्यू झाल्यावर ठाम असले तरी राज्य सरकार वेळकाढूपणा करीत असल्याचे समोर आल्याने खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप करत एनआयएमार्फत चौकशीचे आदेश द्या, अशी मागणी करत दाखल करण्यात आलेल्या याचिकेची न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेत वेळकाढूपणा करणाऱ्या राज्य सरकारला दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.

८ जून २०२० रोजी एका १४ मजल्याच्या इमारतीवरून पडल्याने दिशा सालियनचा मृत्यू झाला. केंद्रीय तपास यंत्रणेतील सीबीआय अधिकाऱ्यांनी ही आत्महत्या असल्याचा निष्कर्ष काढला.

राज्य सरकारने भूमीका मांडण्यासाठी खंडपीठाकडे वेळ मागितल्याने न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. घटनेच्या पाच वर्षांनंतर दाखल झालेल्या या याचिकेवर राज्य सरकारला दोन आठवड्यात तातडीने भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी तहकूब केली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *