दिशा वेल्फेअर ग्रुपच्यावतीने
जागतिक दिव्यांग दिन साजरा
मुंबई, दि ४- विक्रोळी कन्नमवार नगर येथील दिशा वेल्फेअर ग्रुप या सामाजिक संस्थेच्या वतीने ३ डिसेंबर २०२५ हा जागतिक दिव्यांग दिन संत गजानन महाराज चौकात साजरा करण्यात आला. याप्रसंगी दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी सायकल, व्हील चेअर तसेच रुग्णोपयोगी वस्तूचे वाटप इंडियन मेडीकल असोशिएशन एनईबीएस चे अध्यक्ष डॉ. हरिश पांचाळ, दिशा वेल्फेअर ग्रुपचे संस्थापक संचालक भास्कर बेरीशेट्टी व रुग्णमित्र विनोद साडविलकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास शांतीवनच्या सर्वेसर्वा निलिमा दिदि,समाजसेविका जयश्री दिदी, माजी नगरसेवक उपेंद्र सावंत, प्रभात मित्र मंडळाचे सचिव, ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे, विक्रोळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष राहूल वाघधरे, विक्रोळी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रज्ञा कदम, भाजपा विक्रोळी पूर्व मंडळ प्रमुख केतकी सांगळे, सक्षम महिला मंडळाच्या अध्यक्षा पुजा दळवी, दिशा ग्रुपचे अध्यक्ष दिनेश बेरीशेट्टी, ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक कृष्णा काजरोळकर आदि मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी संवेदना सोशल फाऊंडेशनच्या मुक कर्णबधिर मतिमंद विद्यार्थ्यांना नित्योपयोगी वस्तू आणि संवेदना संस्थेला, ऑक्युपेशनल थेरपी संच आणि संबंधित ११ वस्तूंचे वाटप संस्थेच्या अध्यक्षा प्रिती शिरिशकर यांच्या स्वाधिन माजी नगरसेवक उपेंद्र सावंत व निलिमा दिदी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास मतिमंत विद्यार्थ्यांचा उत्साह ओसांडून वाहत होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश पालव भगवान कुलॅ, सहिष्णूता कांबळे, निशा जाधव, सुरेश पांचाळ यांनी बरीच मेहनत घेतली होती.KK/ML/MS