१ ऑगस्ट पासून एसटीच्या डिझेल खरेदीवर सवलत सुरू…

मुंबई दि २ — महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत डिझेल खरेदी करीत असलेल्या मे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या कंपन्यांनी दिनांक ०१.०८.२०२५ पासून लागू होणाऱ्या दरानुसार डिझेलवर सवलत (discount) देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार १ ऑगस्ट पासून या कंपन्यांनी ₹3.00 प्रति किलो लिटर (बेंचमार्क दरापेक्षा) सवलतीचा दर देण्यास सुरु केले आहे. त्यामुळे महामंडळास डिझेल खरेदीवर एकूण ₹3.00 प्रति किलो लिटर इतकी सवलत प्राप्त होणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले की ही सवलत ०१.०८.२०२५ पासून पुढे लागू झाली असून त्यामुळे महामंडळाच्या इंधन खर्चात लक्षणीय बचत होणार आहे. याचा सकारात्मक परिणाम महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर होणार असून सेवांचे सुरळीत व आर्थिकदृष्ट्या सक्षम संचालन करता येणार आहे. या संदर्भात महामंडळाच्या सर्व विभागांनी व आगारांनी या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी, असे निर्देश मंत्री सरनाईक यांच्या कडून देण्यात आले आहेत.