राधानगरी धरणातून विसर्ग सुरू…

कोल्हापूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरण 100 टक्के भरले असून आज सकाळी 10.05 वाजता धरणाचा 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. पावसाचा जोर राहिला तर धरणाचे अन्य स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे धरणातून 2928 क्युसेक्स इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात होत आहे. नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ML/ML/SL
25 July 2024