भारतीय शेअर बाजारात भूकंप! सेन्सेक्स ४ हजार अंकांनी कोसळला, निफ्टीही भुईसपाट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापर कर धोरणाचे गंभीर परिणाम अमेरिकन शेअर बाजारात दिसून येत असताना आशियाई शेअर बाजारांमध्येही मोठी पडझड पाहायला मिळाली. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजार तब्बल ४००० अंकांनी कोसळल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्सप्रमाणेच निफ्टीचीही मोठी पडझड झाली असून तो थेट २१,८०० अंकांच्या खाली गेला आहे. जगभरातल्या शेअर बाजारांवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार कराचे परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे आजचा दिवस भारतीय बाजारासाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरत आहे.