दिग्दर्शक रोहित शेट्टी जखमी
मुंबई,दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंघम’, ‘दिलवाले’ आणि ‘सूर्यवंशी अशा लोकप्रिय चित्रपटांचा दिग्दर्शक रोहित शेट्टी शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहित हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये त्याच्या आगामी ‘इंडियन पुलिस फोर्स’ (Indian Police Force) या वेबसीरिजचं शूटिंग करत होता. एका सीक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान ही घटना घडली आहे.
त्याला कामिनेनी (Kamineni) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या हातावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. शस्त्रक्रियेनंतर रोहित उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून सध्या त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, असे रुग्मालयाने जाहीर केलेल्या मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
अॅमेझॉन प्राइमच्या ‘इंडियन पुलिस फोर्स’ या वेबसीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) मुख्य भूमिकेत आहे. गेल्या काही दिवसांपासून या वेबसीरिजचं शूटिंग सुरू आहे. रोहित आधी या वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थलादेखील किरकोळ दुखापत झाली होती. रोहित आणि सिद्धार्थ दोघेही या वेबसीरिजच्या माध्यमातून वेबविश्वात पदार्पण करत आहेत
7 Jan. 2023