एशियन कल्चर पुरस्काराने दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा गौरव

 एशियन कल्चर पुरस्काराने दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा गौरव

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक चित्रपटांची मेजवानी घेऊन येणाऱ्या यंदाच्या २०व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात हिंदीतील प्रथितयश दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना ‘एशियन कल्चर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. चित्रपट क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांचा हा विशेष सन्मान होणार असून आशियातील महत्त्वपूर्ण मान्यवर व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

तसेच दिवंगत सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी देण्यात येणारा चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार लेखक प्रकाश मगदुम यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या ‘द महात्मा ऑन सेल्युलॉइड’ या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कामाकरिता फिल्म सोसायटी चळवळीचे कार्यकर्ते सुभाष देसाई यांना ‘सत्यजित रे’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

‘शोले’, ‘शान’, ‘सीता और गीता’, ‘सागर’ सारख्या अतिशय लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी रसिकांना आजवर अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांनी इतिहास रचला असून भारतीय चित्रपटांसाठी त्यांचे अमूल्य योगदान राहिले आहे.

२० व्या ‘थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा’ ची प्रतिनिधी नोंदणी ५ जानेवारीपासून सुरू झाली असून www.thirdeyeasianfilmfestival.com या वेबसाइटवर ऑनलाईन नोंदणी करता येईल. तसेच सिटीलाइट सिनेमा, माहिम, कांदिवली येथील ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स आणि पीव्हीआर सिनेपोलिस, ठाणे यथे सकाळी ११.०० ते सायंकाळी ७.००वा. प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करता येऊ शकते. Director Ramesh Sippy felicitated with Asian Culture Award

ML/KA/PGB
8 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *