साखर आयुक्तांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा थेट ऊसाच्या फडात..

 साखर आयुक्तांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा थेट ऊसाच्या फडात..

बीड, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात सर्वाधिक ऊस बीड जिल्ह्यात शिल्लक आहे. साखर कारखानदारांच्या मनमानी कारभाराविरोधात, ऊस प्रश्नावरून शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. बीडच्या आनंदगावमध्ये साखर आयुक्तांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा थेट ऊसाच्या फडात काढत, शेतकरी संघर्ष समितीने अनोखे आंदोलन केले.

बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. The problem of excess sugarcane has arisen in Beed district मात्र साखर कारखानदार मनमानीपणा करत आहेत, मनाला वाटल त्याचा ऊस घेऊन जात आहेत. आणि त्यामुळेच हिंगणगावमध्ये नामदेव जाधव या शेतकऱ्याने ऊसाचा फड पेटवून देत गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे ही आत्महत्या नसून खून आहे. त्यामुळे साखर आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी शेतकरी नेते भाई गंगाभीषण थावरे यांनी केलीय.Such a demand was made by farmer leader Bhai Gangabhishan Thaware.

त्याचबरोबर माजलगाव तालुक्यात 3 कारखाने आहेत, मात्र ते देखील शेतकऱ्यांचा ऊस लवकर घेऊन जात नाहीत. आज हार्वेस्टर लावायचं म्हणलं तर 20 हजार रुपये द्यावे लागतात, पैसे दिल्याशिवाय कोणी उस घेऊन जात नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट ओढवले आहे. मात्र साखर आयुक्त याकडे दुर्लक्ष करत असून साखर कारखानदारचं पोहोचण्याचे काम साखर आयुक्त कार्यालयाकडून होत आहे. त्यामुळे या सर्वांचा निषेध म्हणून आम्ही उसाच्या फडात साखर आयुक्तांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून आंदोलन केल आहे. त्यामुळे आता तरी कारखानदारांनी, साखर आयुक्तांनी शेतकऱ्यांचा ऊस लवकरात लवकर घेऊन जावा. अन्यथा उग्र आंदोलन करू. असा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे नेते भाई गंगाभिषण थावरे यांनी दिला आहे..directly in the sugarcane field.

ML/KA/PGB

25 May 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *