अंतराळातून पृथ्वीवर विज पुरवठा करणारा स्टार्टअप
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
अंतराळात वीज निर्मीती करण्यासाठी अमेरिका, चीन, जापान हे देश अनेक वर्षांपासून करत आहेत. एका छोटाशा स्टार्ट कंपनीने या उपक्रमात आघाडी आता घेतली आहे.यूके स्पेस सोलर, रेकजाविक एनर्जी आणि आइसलँड यांच्या भागीदारीतून हा स्पेस सोलर पॉवर प्रोजेक्ट राबवला जाणार आहे.
अंतराळात वीज निर्मीती हा उपग्रह सौर पॅनेलसह सुमारे 400 मीटर रुंद असेल. या उपग्रहाचे वजन 70.5 टनापर्यंत असू शकते. पृथ्वीच्या मध्यम कक्षेतील ग्रहाभोवती हा उपग्रह फिरणार आहे. ही कक्षा 2,000 आणि 36,000 किलोमीटरच्या दरम्यानच्या उंचीवर अंतराळाच्या जवळ आहे.
अवकाशातील उपग्रहातून उच्च-फ्रिक्वेंसी रेडिओ लहरींच्या स्वरूपात ऊर्जा पृथ्वीवर पाठवली जाणार आहे. जमिनीवर असलेल्या अँटेनाच्या माध्यमातून ही ऊर्जा एकत्रित करुन तिचे विजेमध्ये रूपांतर केले आहे. यानंतर ते पॉवर ग्रीडला पाठवले जाणार आहे.
SL/ ML/SL