कै. दिनू रणदिवे पुरस्कार मधू कांबळे यांना प्रदान

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ख्यातनाम पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आघाडीचे शिलेदार कै. दिनू रणदिवे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पुरस्कार , ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांना मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते रोख पंचवीस हजार आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर होते.
याप्रसंगी व्यासपीठावर मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण तसेच प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष गुरबीर सिंग उपस्थित होते.
या सत्कार सोहळ्यास अनेक मान्यवर, संपादक, पत्रकार, तसेच अनेक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
ML/ML/PGB 20 July 2024