प्रशांत डिंगणकर यांच्या
“मनबाधा”चे सोमवारी प्रकाशन

 प्रशांत डिंगणकर यांच्या“मनबाधा”चे सोमवारी प्रकाशन

मुंबई, दि ४ : पत्रकार.लेखक प्रशांत डिंगणकर यांच्या “मनबाधा” या ललित लेख संग्रहाचे प्रकाशन सोमवार ६ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांच्या हस्ते “मनबाधा”चे प्रकाशन होणार असून सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

रवींद्र नाट्य मंदिर लघु नाट्यगृहात (पु. ल. देशपांडे कला अकादमी) दुपारी ३.३० वाजता हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार असून ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोकर आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. महेश केळुसकर यावेळी खास उपस्थित राहणार आहेत.

मनबाधा हा हळव्या मनातील हलकल्लोळाचा वेध घेणारा ललित लेख संग्रह असून या प्रकाशन सोहळ्याला सर्व साहित्य रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन स्वामीराज प्रकाशनचे रजनीश राणे आणि प्राची तसेच सई डिंगणकर यांनी केले आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *