दिंडोशी येथील विद्यार्थी गुणगौरव सोहळा जल्लोषात संपन्न

मुंबई (प्रतिनिधी)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला
शिवसेना आमदार विभाग प्रमुख सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा 44 च्या वतीने शाखाप्रमुख सुभाष धानुका यांनी दिंडोशी गणपती मंदिर येथे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच शालेय विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम असून सामाजिक सेवा सप्ताह म्हणून आम्ही मतदारसंघात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आमदार विभाग प्रमुख सुनील प्रभू यांनी आपल्या भाषणात सांगितले
या कार्यक्रमात 125 विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला असून 500 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महीला विधानसभा प्रमुख शुभांगी शिंदे,महीला विधानसभा संघटक नमिताताई कल्याणकर, उपविभाग प्रमुख प्रदिप ठाकुर साहेब, महीला उपविधानसभा संघटिका सौ. तनुजा मांजरेकर, शाखा प्रमुख श्री. सुभाष धानुका, महीला शाखा संघटक श्रीमती ताराताई निवंगुणे, शाखा समन्वयक हर्षल सुरे, कार्यालय प्रमुख राजू नाथा गायके, राजू त्रिभुवन उपस्थित होते. ML/ML/MS