तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससूनच्या अहवालात महत्त्वपूर्ण खुलासा

 तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससूनच्या अहवालात महत्त्वपूर्ण खुलासा

पुणे, दि.१८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे तनिषा भिसे या महिलेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणी दीनानाथ रुग्णालयच पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप होत होता मात्र आज समोर आलेल्या ससून रुग्णालयाच्या अहवालात महत्त्वपूर्ण खुलासे समोर आले आहेत.

ससून रुग्णालयाच्या चौकशी समिती अहवालाती निष्कर्ष

इंदिरा आयव्हीएफमध्ये तब्येतीत सुधारणा होत नसताना देखील 4-5 दिवस दाखल करून घेणे चूक होती. गर्भवती महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे स्पष्ट झालेले असताना तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवायला हवे होते. या सगळ्यात आयव्हीएफ सेंटरची जबाबदारी महत्वाची आहे. त्यांनी लवकर रुग्णास दुसरीकडे पाठवणे गरजेचे होते.

तनिषा भिसे यांना मंगेशकर रुग्णालयात पाच तास थांबवले होते. मात्र या वेळी पैसे घेतले की नाही? किंवा हेच कारण होते का? पैसे द्या नाहीतर ट्रीटमेंट करणार नाही, असे प्रश्न होते. याबाबत आरोग्य उपसंचालक यांनी चौकशी करून अहवाल द्यायचा आहे. त्याची चौकशी आरोग्य उपसंचालक यांनी केली आहे.

अती जोखमीची परिस्थिती असताना मल्टीस्पेशालिटी रुग्णालयामध्ये तनिषा भिसे यांना नेण्याची गरज होती. मात्र ते करण्यात आले नाही. त्या महिलेस सूर्या रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी प्रसृती झाली. मात्र रुग्णालयात कोणताही कार्डिओलॉजिस्ट उपलब्ध नव्हता. त्या महिलेस ह्रदयविकाराच्या धोका वाढला होता. त्यामुळे जवळपास दोन तास सीपीआर दिले जात होते.गर्भवती महिला गुंतागुंतीचे रुग्ण होता.

मृत्यू मणिपालमध्ये झाला. हा माता मृत्यू असतानाही त्यांनी शवविच्छेदन केलेले नाही. ससून रुग्णालयाला त्यांनी मृत्यू झाल्यानंतर कळवणे गरजेचे होते. हे झालेले नाही.

SL/ ML/ SL

18 April 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *