अ. भा. एल्गार मराठी गझल संमेलनाध्यक्षपदी डॉ. दिलीप पांढरपट्टे
बीड, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुसरे अ. भा. एल्गार मराठी गझल संमेलन, अंबाजोगाई येथे एक आणि दोन फेब्रुवारी २०२५ असे दोन दिवस आयोजित केले असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्यातनाम मराठी तथा उर्दू गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची निवड करण्यात आली आहे. संमेलन स्वागत समितीची बैठकीत ही निवड करण्यात आली अशी माहिती स्वागताध्यक्ष दगडू लोमटे यांनी दिली आहे. डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी मराठी तथा उर्दू भाषेत गझल लिहिल्या असून त्यांची “शब्द झाले सप्तरंगी”, “उडवाच मान माझी” ही मराठी गझलेची पुस्तके प्रकाशित आहेत. “फूलों के खंजर” हा हिंदी तथा उर्दू गझल संग्रह प्रकाशित आहे.
ML/ML/SL
2 Jan. 2025