दिल दोस्ती दुनियादारी फेम अभिनेत्रीचा झाला साखरपुडा

मुंबई,दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल दोस्ती दुनियादारी या लोकप्रिय मालिकेतून मिनल ही डॅशिंग भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आता लग्न बंधनात अडकणार आहे. स्वानंदीने इंडियन आयडॉल १२ फेम आशिषसोबतचा फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली. आमचं ठरलं म्हणत दोघांनी २३ जुलै रोजी आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. काल दोघांचा साखरपुडा पार पडला. स्वानंदी ही अभिनेते उदय टिकेकर आणि शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची एकुलती एक कन्या आहे.
अस्सं माहेर नको गं बाई’, “अगं अगं सुनबाई…” या मालिकेत स्वानंदीने मुख्य भूमिका केल्या होत्या. सुलेखा तळवलकरच्या दिल के करीब या कार्यक्रमात नुकतीच तिची मुलाखतही झाली आहे.
स्वानंदीने एंगेजमेंटनंतर तिला व आशिषला मिळणाऱ्या चाहत्यांच्या प्रेमाबद्दल भावना व्यक्त केल्या. “आमच्या सोशल मीडिया पोस्टवर आमच्या शुभचिंतकांनी दिलेल्या प्रेमामुळे आम्ही आनंदी आहोत. आम्हाला खरोखर खूप चांगलं वाटत आहे. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. सध्या मी एवढंच सांगू शकते की मी खूप आनंदी वातावरणात आहे. मी आमच्या आयुष्यातील एका फ्रेश, नव्या अध्यायाची वाट पाहत आहे. आशिष आणि मी आमच्या जवळचे मित्र आणि कुटुंबियांसोबत हा खास वेळ घालवत आहोत,” असं स्वानंदीने म्हटलं आहे.
SL/KA/SL
24 July 2023
ML/KA/SL
24 July 2023