दीक्षाभूमी येथे शेकडो नागरिकांनी घेतली धम्म दिक्षा…

 दीक्षाभूमी येथे शेकडो नागरिकांनी घेतली धम्म दिक्षा…

नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून आज नागपुरातील दीक्षाभूमी येथे धम्मदीक्षा विधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी चे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचा नेतृत्वात भिक्खू संघातर्फे यावेळी शेकडो नागरिकांना बौध्द धम्माची दीक्षा देण्यात आली..

सकाळी 9 वाजेपासून या धम्म दिक्षा विधी सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. हा सोहळा 24 ऑक्टोंबर पर्यंत चालणार आहे.. प्रारंभी आज सकाळी भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचा नेतृत्वात भिक्खू संघातर्फे तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले..

त्यानंतर सामुहिकरित्या त्रिषरण, पंचशिल, बुद्ध वंदना, धम्म वंदना आणि संघ वंदना घेण्यात आली .. त्यांनतर भिक्खू संघातर्फे नवीन भंते यांना धम्मदीक्षा देण्यात आली, याशिवाय लहान मूल असलेल्यानांही यावेळी श्रामनेर धम्म दीक्षा देण्यात आली.. या धम्म दिक्षेनंतर आता या बौध्द भिक्षू ना देशभरातील विवीध बौध्द विहारां मध्ये 4 ते 5 वर्षांचे भुक्षू प्रशिक्षण देण्यात येणार आहे.. या सोहळ्यात अनेक नागरिकांनाही बौध्द धम्माची दिक्षा देन्यात आली.. या सोहळ्यात देश, विदेशातून शेकडो नागरिक सहभागी झाले होते…

ML/KA/PGB 22 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *