उद्योजकाला ‘डिजीटल अरेस्ट’ करुन लुबाडले 58 कोटी रु.

मुंबई, दि. १६ : ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करुन मुंबईत एका उद्योजकाला आणि त्याच्या पत्नीला ‘डिजीटल अरेस्ट’ करुन लुटण्यात आले. आरोपींनी 18 बँक खाती वापरुन 58 कोटी रुपये लुटले आहेत. अब्दुल नासीर खुल्ली, अर्जुन कडवासरा,जेठाराम कडवासरा अशी आरोपींची नावे आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात अडकल्याचे सांगून केले ‘डिजीटल अरेस्ट’मध्ये फसवण्यात आले. दरम्यान, 9 ऑगस्ट ते 8 ऑक्टोबर दरम्यान उद्योजकाने आरटीजीएसद्वारे 58.13 कोटी रुपये दिले.
डिजिटल अरेस्ट हा एक नव्या प्रकारचा ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार आहे, ज्यामध्ये सायबर गुन्हेगार लोकांना सरकारी अधिकारी, पोलीस, किंवा कायदा अंमलबजावणी यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून भीती दाखवतात आणि पैशांची जबरदस्तीने वसुली करतात.
डिजीटल अरेस्टपासून रहा सावध
- अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका.
- सरकारी यंत्रणा कधीही फोनवर पैसे मागत नाही.
- कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, खाते तपशील देऊ नका.
- पोलीस स्टेशन किंवा सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर लगेच तक्रार करा.
- cybercrime.gov.in या अधिकृत वेबसाइटवर तक्रार नोंदवा.
SL/ML/SL 16 Oct. 2025