डिजिटल अरेस्टची तरतूदच कायद्यात नाही
मुंबई दि २४ : डिजिटल अरेस्ट करण्याची कोणतीही तरतूद कायद्यात नाही त्यामुळे अशा पद्धतीचे कॉल किंवा व्हिडिओ कॉल आले तर थेट १९३० या मदत क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा म्हणजे पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
याबाबतचा प्रश्न अबू आझमी यांनी उपस्थित केला होता, आशुतोष काळे, अभिजित पाटील यांनी उपप्रश्न विचारले. आपल्याकडे व्यापक सायबर गुन्हे यंत्रणा उपलब्ध आहे त्यामुळे गुन्हा घडल्यापासून एका तासात तक्रार केल्यास गेलेले पैसे परत मिळवणे शक्य होते असं ही फडणवीस म्हणाले.ML/ML/MS