शेलूबाजार येथे डायरीयाची लागण; ४० रुग्ण बाधीत!
वाशिम, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील शेलु बाजार येथे गेल्या दोन दिवसांत जवळपास ४० लोकांना डायरीयाची लागण झाली असून काही रुग्णांना अकोला तर काहींना वाशीम येथे रेफर केल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत महाकाळ यांनी दिली. २२ जून रोजी १५ रुग्णांना डायरीया ची लागण झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचाराकरिता अकोला, वाशीम येथे रेफर केले तर दुसऱ्या दिवशी म्हणजे दि २३ जून रोजी सुध्दा २५ लोक बाधीत झाले आहेत .
त्यांना सुध्दा प्राथमीक उपचार करुन रेफर करण्यात आले आहे तसेच आरोग्य सेवक, आशा वर्कर यांच्या कडून संपूर्ण गावात डायरीचे लक्षणे असणार्यांची माहीती तसेच सर्वेक्षण केले जात आहे. सोबतच पाण्याचे नमुने सुध्दा तपासणी साठी पाठविण्यात येणार आहे. गावातील लोकांसाठी गुप्ता चौकातील तसेच मालेगाव रोडवरील नागरीकांसाठी जि प शाळेतील अंगणवाडीत ओपीडी सुरु करण्यात आल्याची डॉ महाकाळ यांनी दिली.
ML/ML/SL
25 June 2024