रेल्वे प्रवासात मधुमेहींसाठी ‘डायबेटिक फूड’ ची सोय
मुंबई, दि. ७ : भारतीय रेल्वेने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवडक प्रीमियम गाड्यांमध्ये ‘डायबेटिक फूड’ म्हणजेच साखरमुक्त आणि संतुलित जेवण उपलब्ध करून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे मधुमेहींना प्रवास सुरक्षित आणि आरोग्यदायी होणार आहे. प्रवासी तिकीट बुक करतानाच ‘Diabetic Meal’ हा पर्याय निवडू शकतात. IRCTC यांनी सांगितले आहे की, “हा आहार पूर्णपणे नियंत्रित, स्वच्छ आणि आरोग्याला अनुकूल असेल.”
प्रवाशांकडून वाढलेल्या मागणीचा विचार करून, खालील तीन प्रीमियम गाड्यांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे:
राजधानी एक्सप्रेस (Rajdhani Express)
शताब्दी एक्सप्रेस (Shatabdi Express)
दुरांतो एक्सप्रेस (Duronto Express)
तसेच, भुसावळ विभागातून धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस आणि राजधानी एक्स्प्रेस मध्येही याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आगामी काळात ही सुविधा इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही देण्याची योजना आहे.
रेल्वेत दिले जाणारे हे जेवण मधुमेहींना लक्षात ठेवून तयार केले जाते. या भोजनात खालील पदार्थांचा समावेश असतो:
उकडलेल्या किंवा कमी मसाल्यातील भाज्या
संपूर्ण धान्य (Whole-Grain) पासून बनवलेले पदार्थ
कमी फॅट्स असलेले प्रथिनयुक्त अन्न
ताजे फळांचे नियंत्रित प्रमाण
SL/ML/SL