धुरंधर 2 – ॲडव्हान्स बुकिंगमध्येच सर्व शोज हाऊसफुल

 धुरंधर 2 – ॲडव्हान्स बुकिंगमध्येच सर्व शोज हाऊसफुल

मुंबई, दि. १७ : आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर- १ च्या प्रचंड यशानंतर त्याचा दुसरा भाग ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या प्रदर्शित व्हायला आता दोन दिवस राहिले आहेत. ॲडव्हान्स बुकिंगमध्येच या चित्रपटाचे सर्व शोज हाऊसफुल झाले आहेत. जगभरातील ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शनच्या बाबतीत रणवीर सिंहचा हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडत आहे. ‘धुरंधर 2’चे लाखो तिकिट्स विकले गेले आहेत. ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत ‘धुरंधर 2’ने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. पेड प्रीव्ह्यूजमध्ये जवळपास 8 लाख तिकिटं विकली गेली असून 35 कोटी रुपयांची कमाई त्यातून झाली आहे. रणवीरच्या या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमधून तब्बल 21 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगभरातील ॲडव्हान्स बुकिंगचा आकडा तब्बल 125 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

या चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये असलेली एवढी क्रेझ पाहून अखेर थिएटर मालकांना महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यांनी रात्री उशिराचे आणि मध्यरात्रीचेही काही शोज नव्याने समाविष्ट केले आहेत. त्यामुळे भारतातील अनेक भागात या चित्रपटाचे 24 तास शोज लागणार आहेत.

‘धुरंधर 2’चे आतापर्यंत भारतात 15 लाख तिकिटं विकली गेली आहेत. यापैकी निम्मा आकडा हा बुधवारी पार पडणाऱ्या प्रिव्ह्यू शोजसाठी आहे. जवळपास चार तासांच्या या चित्रपटासाठी थिएटरमध्ये एका स्क्रीनवर चारपेक्षा अधिक शोज लावले जाणार आहेत. प्रेक्षकांची वाढती मागणी पाहून बऱ्यात थिएटर चेन्सने मध्यरात्रीचेही शोज समाविष्ट केले आहेत. भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात असं क्वचित एखाद्या चित्रपटाबाबत घडतं. यावरून या चित्रपटाची लोकप्रियता लक्षात येते.

मुंबई आणि ठाण्यातील पीव्हीआर चकाला, मूव्ही मॅक्स सायन यांसारख्या थिएटर्समध्ये वीकेंडला मध्यरात्री 1.50 पासूनचे शोज लावण्यात आले आहेत. रात्री 11.30 पर्यंत हे शोज वेगवेळ्या स्क्रीन्सवर लावले जाणार आहेत. लॉजिस्टिक आणि सुरक्षेशी संबंधित कारणांमुळे सर्वच शहरांमध्ये हे शक्य नसलं, तरी पश्चिम आणि दक्षिण भारतातील अनेक थिएटर्स 24 तासांत याच मार्गाचा अवलंब करतील आणि रात्री उशिराचे शोज सुरू करतील, असं म्हटलं जात आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *