कॅन्सर रुग्णांना मदत करणे हे मी परम कर्तव्य समजतो गजेंद्र धुमाळे यांचे प्रतिपादन

 कॅन्सर रुग्णांना मदत करणे हे मी परम कर्तव्य समजतो गजेंद्र धुमाळे यांचे प्रतिपादन

मुंबई, दि १३
परळ विभागात टाटा रुग्णालय असल्यामुळे अनेक रुग्ण या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांना हालाखीचे जीवन सहन करावे लागत आहे. यासाठीच कॅन्सर रुग्णांना जेवढी मदत होईल ते मी करणारच तसेच त्यांना मदत करणे हे मी माझे परम कर्तव्य समजतो असे जाहीर प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र धुमाळे यांनी नायगाव येथे कॅन्सरग्रस्त रुग्णांना जेवण आणि अत्यावश्यक वस्तू वाटप कार्यक्रमात केले. ते पुढे म्हणाले कॅन्सल झाला म्हणून आता काय माणसं घाबरत नाही. प्रत्येक आन्सरचा जोराने सामना करतात. परंतु परळ येथे टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक रुग्ण आपला उपचार घेण्यासाठी येत असतात. यामध्ये अनेक गरीब रुग्ण असतात ज्यांना उपचार घेणे देखील परवडत नाही. अशा रुग्णांना आपण काहीतरी केले पाहिजे या भावनेतून त्यांना मदत करायच्या दृष्टीने आज मी या ठिकाणी कॅन्सर व्यस्त रुग्णांना जेवण आणि हॅन्ड ज्यूसर वाटप केले. जेणेकरून रुग्णांना एखाद्या फळाचा ज्यूस काढून त्यांना ताबडतोब त्याचा लाभ घेता येईल.
परळ येथील टाटा रुग्णालयामध्ये कॅन्सलग्रस्त रुग्ण उपचारासाठी येत असतात. परंतु त्यामधील अनेक रुग्ण अतिशय गरीब असून त्यांना उपचार घेणे देखील परवडत नाही. अशा रुग्णांना गजेंद्र धुमाळे हे आपल्या स्वइच्छेने काही ना काही मदत करत असतात. आज या ठिकाणी त्यांनी रुग्णांना मोफत जेवण आणि ज्युसर वाटप केले याचा खरंच कॅन्सर व्यस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. त्याबद्दल मी धुमाळे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि यापुढे देखील ते अशाच प्रकारे या रुग्णांना काही ना काही सेवा उपलब्ध करून देतील अशी अपेक्षा बाळगतो अशी माहिती सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त पवन त्रिपाठी यांनी या कार्यक्रमातून दिली. या कार्यक्रमांमध्ये कॅन्सरग्रस्त रुग्ण पुरुष , लहान मुले आणि महिला यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *