या मराठी फलंदाजाकडे धोनीने सोपवले CSK चे कर्णधारपद

 या मराठी फलंदाजाकडे धोनीने सोपवले CSK चे कर्णधारपद

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एमएस धोनीनं (MS Dhoni) कर्णधारपदाचा राजीनामा देत मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला चेन्नई सुपर किंग्सचं CSK चं कर्णधारपद सोपवलं आहे.CSK कडून सोशल मीडियावर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. चेपॉकवर चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये सलामीची लढत होणार आहे. त्याआधी धोनीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिला, संघाची धुरा युवा ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाडच्या कर्णधारपदाबाबत स्टेटमेंट जारी करण्यात आले आहे. “एमएस धोनीन आयपीएल 2024 आधी संघाची धुरा ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवली आहे. ऋतुराज गायकवाड 2019 पासून संघासोबत आहे. त्यानं आतापर्यंत 52 सामने खेळले आहेत.”

आगामी IPL हंगामासाठी आज सर्व 10 संघांच्या कर्णधारांचे एकत्र फोटोशूट झाले. यावेळी सीएसकेचा कर्णधार म्हणून धोनी दिसणार, असा सर्वांचा समज होता. पण प्रत्यक्षात झाले वेगळेच. धोनीच्या जागी सीएसकेचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवण्यात आले आहे. एमएस धोनी आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने पाच वेळा चषकावर नाव कोरलेय. 2019 मध्ये धोनीनं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर तो आयपीएल खेळत आहे. मागील काही वर्षांपासून धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार अशा चर्चा सुरु आहे. यावेळीही धोनी निवृत्ती घेणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच आता चेन्नईचं नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आलेय. तसे संकेतच फ्रँचायझीकडून आज दिले गेले.

उद्याचा सामना पहा मोफत

आयपीएलच्या १७व्या हंगामाला उद्यापासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जचा सामना रायल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्याशी होणार आहे. दोन्ही संघामध्ये अनुभवी खेळाडू आहेत. परंतु, चेन्नई आणि आरसीबीचा संघ आपपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएल २०२४ मधील पहिला सामना शुक्रवारी (२२ मार्च २०२४) खेळला जाणार आहे. चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील सामना संध्याकाळी ८ वाजता सुरू होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल.Geo वर चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग केले जाणार आहे. आपण हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमध्ये सामने पाहू शकणार आहेत. यासाठी कोणत्याही सब्स्क्रिप्शनची गरज लागणार नाही.

SL/ML/SL

21 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *