ढोले पाटील ज्युनिअर कॉलेजची कु. गौरी गरुड किकबॉक्सिंग मध्ये जिल्ह्यात प्रथम!

 ढोले पाटील ज्युनिअर कॉलेजची कु. गौरी गरुड किकबॉक्सिंग मध्ये जिल्ह्यात प्रथम!

पुणे, दि १७: पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हा स्तर किकबॉक्सिंग स्पर्धा सन २०२५–२६ नुकतीच आंबेगाव बुद्रुक येथे पार पडली.

या स्पर्धेत ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सच्या विद्यार्थिनी कु. गौरी गरुड हिने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.तिच्या या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी तिची निवड झाली असून, महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे.

या यशाबद्दल सन्माननीय चेअरमन श्री. सागरजी ढोले पाटील यांनी गौरव व्यक्त करत सांगितले की, “विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, योग्य प्रशिक्षण आणि सतत प्रेरणा मिळाली तर ते कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात.”

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विठ्ठल गायकवाड यांनी कु. गौरी गरुड हिचे अभिनंदन करून शासनाच्या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

गौरीच्या या यशामागे तिचे मेहनत, समर्पण आणि संस्थेचे प्रेरणादायी वातावरण आहे.संपूर्ण ढोले पाटील परिवाराने गौरीचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *