धारूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

बीड, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तीन दिवसापासून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळीसह काही भागात सायंकाळच्या दरम्यान अवकाळी पाऊस पडत आहे. आज बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील सोनिमोहा, आंबेवडगाव परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाला आणि आंब्याचे मोठं नुकसान होत आहे. आज दुपार पासून जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली मात्र धारूर तालुक्यातील सोनिमोहा, आंबेवडगाव परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला आहे. तर या परिसरात सखल भागात पाणी साचले आहे. Dharur taluka with hailstorm accompanied by gale force winds
ML/ML/PGB
11 Apr 2024