सर्व आदिवासींना धरती आबा योजनेतून वीज पुरवठा…

मुंबई दि १५– राज्यातील सर्व आदिवासींच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरती आबा ही योजना राबवली असून त्यात वीज पुरवठा योजना देखील आहे, त्यामध्ये ६,९६१ जोडण्या देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे त्यापैकी ४, ६८७ जोडण्या देण्याचं काम पूर्ण झालं आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
याबाबतचा मूळ प्रश्न राजू तोडसाम यांनी उपस्थित केला होता त्यावर धर्मराव बाबा आत्राम, रामदास मसराम यांनी उपप्रश्न विचारले. गडचिरोली जिल्ह्यात वीज पुरवठा करणाऱ्या पायाभूत सुविधांचे अंतर कमी करून वीज खंडित होणे कमी करण्यात येईल असं ही ते म्हणाले.

प्रधानमंत्री जन मन योजनेतून आदिम जमातींसाठी वीज पुरवठा करणाऱ्या योजनेला निधी उपलब्ध करून दिला जात आहे, त्यातून ८,५०० वीज जोडण्या देण्याचं उद्दिष्ट होतं, मात्र प्रत्यक्षात आपण अकरा हजार पेक्षा जास्त जोडण्या देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.ML/ML/MS