धर्मेंद्रचा अखेरचा चित्रपट OTT वर
मुंबई, दि. 23 : दिवंगत अभिनेते धर्मेद्र यांचा अखेरचा चित्रपट इक्कीस 26 फेब्रुवारीला Prime Video वर दाखल होत आहे. दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा हा युद्धपट सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 1971 च्या बसंतरच्या लढाईच्या पार्श्वभूमीवर कथा उलगडते. चित्रपटात युद्धदृश्यांबरोबरच वडील ब्रिगेडियर मदन लाल खेतरपाल आणि पाकिस्तानातील ब्रिगेडियर जान मोहम्मद निसार यांच्यातील भावनिक भेटही दाखवली आहे. सीमा ओलांडणाऱ्या वेदना आणि सैनिकांचा सन्मान यांचा वेध हा चित्रपट घेतो.
या चित्रपटात अगस्त्य नंदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. अगस्त्य हा अमिताभ बच्चन यांचा नातू आणि श्वेता बच्चन यांचा मुलगा आहे. तो या चित्रपटात एका शूर सैनिकाची भूमिका साकारत आहे. तर धर्मेंद्र, अरुणचे वडील एमएल. खेत्रपालच्या मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
SL/ML/SL