*अदानी हटाव, धारावी बचावसाठी मुंबई काँग्रेस आक्रमक

मुंबई, दि 7
धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली भाजपा युती सरकार मुंबईतील विविध ठिकाणच्या मोक्याची जमिनी अदानीला भेट देत सुटले आहे. मिठागरे, देवानर डंपिग ग्राऊंडची जमीन दिल्यानंतर कुर्ल्यातील मदर डेअरीची ८.५ हेक्टर जमीनही देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला धारावीकरांचा व मुंबई काँग्रेसचा विरोध असून धारावीकरांच्या मुळावर उठलेल्या भाजपा सरकार विरोधात मुंबई काँग्रेस उद्या रविवारी ८ जून रोजी जनआक्रोश आंदोलन करणार आहे असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली.
कर्ल्यातील मदर डेअरीच्या जागेवर बोटॅनिकल गार्डन करावी ही स्थानिकांची मागणी आहे. या जागेत मोठ मोठे हजारो वृक्ष आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची जागा आहे. ही जागा अदानीच्या घशात घालण्यापासून वाचवण्यासाठी अनेक आंदोलने केली पण सरकार मात्र जनतेकडे दुर्लक्ष करून अदानीसाठी काम करत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जाणार असून या आंदोलनात काँग्रेसचे वरिष्ठ नेते, सर्व आजी माजी खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हे आंदोलन अभ्युदय बँक ते कुर्ला मदर डेअरी, नेहरू नगर, कुर्ला (पूर्व) येथे हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भाजपा महायुती सरकारच्या या निर्णयाला विरोध करावा असे आवाहन मुंबई काँग्रेसने मुंबईकरांना केले असल्याचे सुरेशचंद्र राजहंस सांगितले.