पद्म पुरस्कार जाहीर , अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण
नवी दिल्ली दि २५ : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली असून यात पाच पद्मविभूषण, तेरा पद्मभूषण तर 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण ने सन्मानित करण्यात आले असून महाराष्ट्रातील १५ जणांना पद्मश्री ने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांच्यासोबतच केरळमधील व्ही एस अच्युतानंदन यांना देखील पद्मविभूषण जाहीर करण्यात आले आहे. गायिका अलका याग्निक, उद्योजक उदय कोटक यांना पद्मभूषण पुरस्काराने तर पियुष पांडे यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
113 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून त्यात महाराष्ट्रातील 15 जणांचा समावेश आहे. यात छत्तीसगडमध्ये ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि त्यांच्या पत्नीचा समावेश असून, क्रिकेटपटू रोहित शर्मा आदिवासी संगीत वाद्य कलाकार भिकल्या धिंडा , तमाशा क्षेत्रातील रघुवीर खेडकर , कृषी क्षेत्रातील श्रीरंग लाड , डॉ आर्मीडा फर्नांडिस, दिवंगत अभिनेता सतीश शाह आदींचा समावेश आहे.ML/ML/MS