आरक्षणासाठी धनगर बांधवांनी शेळ्या मेंढ्यासह केले रास्ता रोको…

जालना दि १ : एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात धनगर समाज आक्रमक झाला होता, त्यांनी शहरातील अंबड चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन केले. शेळ्या मेंढ्या रस्त्यावर उतरवून त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी सरकार विरोधात करण्यात जोरदार घोषणाबाजी आली.

एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात धनगर समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शहरातील अंबड चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करत धनगर आंदोलकांनी एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केलीय. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी जालन्यात दीपक बोराडे मागील 14 दिवसांपासून अमरण उपोषण करत आहेत. मात्र अद्यापही त्यांच्या मागणीची सरकारने दखल घेतलेली नाहीये.
त्यामुळे धनगर बांधव आता आक्रमक झाले असून आज सकल धनगर समाजाच्या वतीने राज्यभरात चक्काजाम आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. जालना शहरातील अंबड चौफुली येथेही धनगर आंदोलकांनी रस्त्यावर बसून रस्ता अडवत एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केलीय. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.ML/ML/MS