तीन जिल्ह्याची तहान भागावणारे धनेगाव धरण मोठया पावसाच्या प्रतीक्षेत

बीड, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे हलक्या जमिनीवरील पिके जोमात आली असून काळ्या जमिनीवरील सोयाबीन पिवळी पडत आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अंबाजोगाई येथील काळवटी तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. तर बीड ,लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव धरण आणखी ही मोठया पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
मांजरा प्रकल्प धनेगाव
दि. 25/07/2024
वार :- गुरुवार
वेळ :- 6:00 वाजता.
📍 पाणीपातळी :- 635.73 मी./642.37 मी.
📍 एकूण पाणीसाठा दलघमी = 47.282/224.093
📍 मृत साठा दलघमी =47.130/47.130
📍 जिवंत साठा दलघमी =0.152/176.963
📍 जिवंत पाणीसाठा टक्केवारी : 0.09 %
📍 आवक दलघमी =0.607/6.442
📍 आवक दर =7.03 क्यूमेक्स /248.22 क्यूसेक्स
मांजरा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे त्यामुळे धरणाच्या वरच्या भागातील मांजरा नदीवरील
१) महासांगवी मध्यम प्रकल्प ता.पाटोदा-१००%
२) संगमेश्वर मध्यम प्रकल्प ता. भूम ३०% क्षमतेने भरले आहेत.
ML/ML/SL
25 July 2024