देव – तरंग स्नानासाठी समुद्राकाठी भाविकांची अलोट गर्दी

सिंधुदुर्ग, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पौष अमावास्या आणि श्रवण नक्षत्र एकत्र आल्यास महोदय पर्वणीचा योग येतो. यावर्षी असा योग 5 वर्षांनी आला. त्यामुळे गावोगावच्या ग्रामदैवतां तरंग , पालखी आणि भाविकांनी समुद्र तीर्थस्नान केले. वेंगुर्ले येथील सातेरी-रामेश्वर पंचायतनने यंदाचा योग दिवसभराचा असल्यामुळे दूरदूरच्या गावातील देव-तरंगांना समुद्र स्नानासाठी वेंगुर्ले येथे येण्याचे निमंत्रण धाडले होते .
उपवडे येथील देव तब्बल 50 वर्षांनी तर पुळास आणि मांडकुली येथील देव तब्बल 35 वर्षांनी महोदय पर्वणीत समुद्र स्थानाचा लाभ घेण्यासाठी 30 ते 50 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पायपीट करत आले होते. यंदा सकाळी ८ वाजून २ मिनिटपासून ते सूर्यास्तापर्यंत तीर्थस्नान योग असल्याने भाविकांची तुफान गर्दी सर्वत्र पहायला मिळाली .
यापूर्वी ४ फेब्रुवारी २०१९ साली महोदय पर्वणीचा योग केवळ 1 तासासाठी आला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले प्रमाणेच देवगड , कुणकेश्वर , मालवण , आचरा, शिरोडा , आरवली या सागर किनारी सुदधा तीर्थ स्नानाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.
समुद्रस्नानासाठी आलेल्या भाविकांसाठी विविध संस्था तसेच राजकीय पक्षांकडून नाश्ता , चहापाणी याची व्यवस्था मोफत करण्यात आली होती. उभादांडा ग्रामपंचायतीने लाईफ बोटीसह लाईफ गार्ड तेनात केले होते. सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आला होता.
ML/KA/SL
9 Feb. 2024