अखेर तिढा सुटला! देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवड
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबतीत बरीच खलबतं सुरू होती. एकनाथ शिंदे यांनी माघार घेत आपण मुख्यमंत्री पुन्हा होणार नसल्याचे सांगत भाजपच्या हाती निर्णय सोपवला. त्याप्रमाणे भाजपने निर्णय घेत देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवड निवड केली आहे.
मुख्यमंत्री पदाच्या चर्चेकरता केंद्रीय निरिक्षक बुधवारी मुंबईत आले. निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठरला. तर उर्वरित भाजपाच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर अनुमोदन दिलं. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे.