ते पुन्हा आले! देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, एकनाथ शिंदे, अजित पवार उपमुख्यमंत्री पदी

महाविकास आघाडीचा पराभव करून महायुती प्रचंड बहुमताने विजयी झाली. त्यानंतर मी पुन्हा येईन असं म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज ५ नोव्हेंबरला आझाद मैदान येथे शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुंबईच्या आझाद मैदानात पार पडलेल्या भव्य समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्र, राज्यातील प्रमुख नेते, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उद्योग, क्रिडा आणि सिनेविश्वातील महत्वाची मंडळी यावेळी उपस्थित होती.