मंत्रिमंडळ विस्तार होऊनही अद्याप खातेवाटप नाही , शिंदे गटात अस्वस्थता

 मंत्रिमंडळ विस्तार होऊनही अद्याप खातेवाटप नाही , शिंदे गटात अस्वस्थता

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने सरकारमध्ये सामील होऊन दोन दिवस उलटून गेले असले तरी त्यांच्या नऊ मंत्र्यांना अद्याप खाती देण्यात आलेली नाहीत तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार होऊनही आपल्या हातात काहीच पडले नसल्याने शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्यानंतर त्यातील अजित पवार यांच्यासह नऊ आमदार या सरकारमध्ये मंत्री झाले , त्यांना कोणती खाती मिळतात याची उत्सुकता तिसऱ्या दिवशीही कायम आहे, ती आणखी किमान दोन दिवस अशीच राहील अशी चिन्हे आहेत.Despite the expansion of the cabinet

अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा शपथ घेतली आहे मात्र त्यांना हवे असलेले दालन काही मिळू शकलेले नाही , आधीच्या सरकारमधील त्यांचे दालन देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, सहाव्या माळ्यावर मोठे दालन रिकामे असले तरी ते शापित असल्याचा समज असल्याने अजितदादांनी थेट सातव्या माळ्यावर आदित्य ठाकरे यांच्या कडे असलेले दालन स्वीकारले आहे. बाकीच्यांना मात्र अद्याप हवे तसे दालन मिळालेले नाही.

दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार होऊनही आपल्या हातात काहीच पडले नाही , गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शिंदे गटातील आमदार अस्वस्थ झाले आहेत, त्यांची घुसमट बाहेर पडू लागली असून भरत गोगावले यांनी तर एक भाकरी मिळणार होती आता अर्धीच मिळेल असे म्हटले आहे, संजय शिरसाट यांनी आणखी विस्तार करवाच लागेल असे प्रसाराध्यमांद्वारे स्पष्ट केले आहे. काल गुरुपौर्णिमेच्या दिवशी ठाण्यात यावर बरीच गरमा गर्मी झाल्याचीही चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारला तीन चाकांची रिक्षा म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांची तर पूर्ण अळीमिळी गुपचिळी झाली आहे.

ML/KA/PGB
4 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *