देशात सर्वाधिक परदेशी गुंतवणुक महाराष्ट्रात

 देशात सर्वाधिक परदेशी गुंतवणुक महाराष्ट्रात

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले असल्याची टीका विरोधक शिंदे सरकारवर सातत्याने करीत असतानाच यंदाच्या आर्थिक वर्षात देशातील सर्वाधिक परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रात झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ट्विटरवरुन दिली आहे.

फडणवीसांनी यात दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत तब्बल ६५ हजार ५०२ कोटींची गुंतवणूक राज्यात आली आहे. या गुंतवणूकीत राज्याने कर्नाटक, गुजरात आणि दिल्लीला मागे टाकले आहे.

एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२३ या काळात महाराष्ट्रात १ लाख ८३ हजार ९२४ कोटींची एकूण परदेशी गुंतवणुक महाराष्ट्रात आल्याचे फडणवीस यांनी यावेळी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.

डीपीआयआयटीने दिलेल्या आकडेवारीचा आधार घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती देत आपल्या सरकारचे कौतुक केले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील गुंतवणूक आणि विविध प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने केली जात होती. त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी या माध्यमातून प्रत्युत्तर दिले असल्याचे मानले जात आहे.

ML/KA/PGB 28 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *