देश का प्रकृती परिक्षण अभियानाची नोंद गिनिज बुकात…

बुलडाणा, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयुष मंत्रालयाच्या वतीने देशभर राबविण्यात आलेल्या देश का प्रकृती परीक्षण अभियानाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली असून या अभियानांतर्गत पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ही आयुष मंत्रालयाच्या नावे नोंद झाले आहेत अशी माहिती केंद्रीय आयुषमंत्री प्रताप जाधव यांनी बुलढाणा येथे पत्रकार परिषदेत दिली .
केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्यावतीने 26 नोव्हेंबर संविधान दिनापासून ते 25 डिसेंबर 2024 माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण देशामध्ये देश का प्रकृती अभियान आयुष मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात आलं. एका महिन्याच्या कालावधीत
देशातील एक कोटी 29 लाखाहून अधिक नागरिकांच्या प्रकृतीचे यशस्वीरित्या परीक्षण करण्यात आलं. या परीक्षणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाल्याची माहिती केंद्रीय आयुषमंत्री जाधव यांनी दिली.
याशिवाय या अभियानात नवीन पाच विश्व रेकॉर्ड प्रस्थापित झाले आहेत अशी माहिती ही केंद्रीयजाधव यांनी यावेळी दिली .
या अभियानाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय आयुर्वेददिनाच्या निमित्ताने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले . देश का प्रकृती परीक्षण अभियानाला पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाले आहेत. ते आरोग्य सेवेबद्दल राष्ट्राच्या वचनेबद्धतेत आणि आयुर्वेदाला मिळत असलेल्या जागतिक मान्यतेचे प्रतीक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले . येणाऱ्या काळामध्ये जिल्हा आणि तालुका स्तरावरही आयुर्वेदिक औषधालय केंद्र सरकारच्यावतीने सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही आयुषमंत्री जाधव यांनी यावेळी दिली. देश का प्रकृती परिषद अभियानात 18,1667 स्वयंसेवकांनी योगदान दिले, त्यांचेही आभार केंद्रीय आयुषमंत्री जाधव यांनी यावेळी मानले .
देश का प्रकृतिक अभियानात भारताच्या विविधतेतील एकतेचे रूप दिसून आल्याचे त्यांनी सांगितलं. आयुर्वेदाच्या निवारक आरोग्यसेवा आणि जीवनशैली व्यवस्थापनातील महत्त्वाची भूमिका या अभियानामुळे अधोरेखित झाली आहे. हा डेटा आधारीत दृष्टिकोन साध्य आधारित संशोधनासाठी महत्त्वपूर्ण ठरेल ज्यामुळे आयुर्वेद आणि आधुनिक वैदिक पद्धती यांच्यातील दरी कमी होऊन भारताच्या आरोग्य क्षेत्राच्या प्रगतीला नवे बळ उत्पन्न करून देईल असा आशावाद ही आयुषमंत्री प्रताप जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.
ML/ML/PGB 26 Feb 2025