मानव वन्यजीव संघर्षक्षेत्रात कृषी पंपांचे भारनियमन रद्द

 मानव वन्यजीव संघर्षक्षेत्रात कृषी पंपांचे भारनियमन रद्द

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मानव-वन्‍यजीव संघर्ष तसेच वन्यप्राण्यांच्या हल्‍ल्‍यात जाणारे नागरिकांचे बळी, त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास धास्तावलेला शेतकरी वर्ग ही परिस्थिती लक्षात घेता चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या मानव- वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात असलेल्या जिल्ह्यांमध्ये दिवसा होणारे कृषीपंपांचे विज भारनियमन रद्द करून सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळात कृषीपंपांना सलग वीजपुरवठा करण्‍यात येईल, अशी घोषणा राज्‍याचे वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.Deregulation of agricultural pumps in human wildlife conflict zones

यासंदर्भात राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस Energy Minister Devendra Fadnavis यांच्‍याशी सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चा केली आहे, उपमुख्‍यमंत्र्यांनी यासंबंधी तात्काळ सकारात्‍मक कार्यवाहीचे निर्देश ऊर्जा विभागाला दिले आहेत.

या जिल्ह्यांमध्ये दुपारच्‍या वेळी कृषी पंपांसाठी विज भारनियमन करण्‍यात येत असल्‍यामुळे रात्रीच्‍या वेळी शेतकरी संबंधित कामांसाठी शेतात जातात. अशा वेळी वन्‍यप्राण्‍यांच्‍या होणा-या हल्‍ल्‍यात शेतक-यांचे बळी जाण्‍याचा घटना जिल्‍हयात मोठया प्रमाणावर घडत आहेत.

त्यामुळे सध्या रात्रीच्या वेळी शेतीची कामे करण्यास शेतकरी वर्ग धास्तावलेला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वने मंत्री मुनगंटीवार यांना भेटून विनंती केली होती. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता चंद्रपूर व गोंदिया जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्‍यांना दिवसा कृषी पंपांना विज पुरवठा करण्‍याची विनंती केली व त्‍यांनी सुध्‍दा ती तात्‍काळ मान्‍य केली.

याबाबतचे आदेश लवकरच निर्गमित होणार असून या माध्यमातून चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्‍हयातील शेतकरी, शेतमजूर बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ML/KA/PGB
10 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *