डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा रहीमची खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटका

 डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा रहीमची खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटका

चंदीगड, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

चंदीगड उच्च न्यायालयाने आज सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द करून राम रहीमची निर्दोष मुक्तता केली आहे. हरियाणातील डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. डेरा माजी व्यवस्थापक रणजीत यांच्या हत्येप्रकरणी उच्च न्यायालयाने राम रहीम सह 5 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. हे प्रकरण 22 वर्षे जुने असून तब्बल 19 वर्षांनंतर CBI कोर्टाने ड राम रहीमला दोषी ठरवले होते. राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया तुरुंगात बंद आहे.10 जुलै 2002 रोजी कुरुक्षेत्र येथील रहिवासी रणजीत सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. साध्वीच्या लैंगिक शोषणाचे निनावी पत्र लिहायला रणजित सिंगने आपल्या बहिणीला मिळवून दिल्याचा डेरा व्यवस्थापनाला संशय होता. पोलिस तपासावर असमाधानी रणजित सिंग यांचा मुलगा जगसीर सिंग याने जानेवारी २००३ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआय तपासाची मागणी केली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. ऑक्टोबर 2021 मध्ये डेरा मुखीसह 5 आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते.

या प्रकरणात 2007 मध्ये न्यायालयाने आरोपींवर आरोप निश्चित केले होते. या प्रकरणात सुरुवातीला राम रहीमचे नाव नसले तरी २००३ मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर 2006 मध्ये राम रहीमचा ड्रायव्हर खट्टा सिंहच्या वक्तव्यावर डेरा प्रमुखाचा समावेश करण्यात आला होता. रणजित सिंग यांच्या हत्येचे प्रकरण एका निनावी पत्राशी जोडले गेले आहे, ज्यामध्ये डेऱ्यातील साध्वींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. हे पत्र तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पाठवले होते. रणजीतने आपल्या बहिणीला नन्सच्या लैंगिक शोषणाबाबत निनावी पत्र लिहायला लावल्याचा डेरा संशयित असल्याचा दावा सीबीआयने केला होता.

हे पत्र नंतर सिरसाचे पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी त्यांच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध केले. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2002 रोजी पत्रकार रामचंद्र छत्रपती यांची हत्या करण्यात आली होती. यानंतर 21 नोव्हेंबर 2002 रोजी दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये पत्रकाराचा मृत्यू झाला. छत्रपती हत्येप्रकरणी राम रहीमही जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

SL/ML/SL

28 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *