समाधी सोहळ्यासाठी पांडुरंगाचे आळंदीकडे प्रस्थान

 समाधी सोहळ्यासाठी पांडुरंगाचे आळंदीकडे प्रस्थान

सोलापूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी पंढरपुरातून पांडुरंगाच्या पादुकांचे आणि संत नामदेव महाराजांच्या पादूकांचे आळंदीकडे प्रस्थान झाले. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यावेळी साक्षात पांडुरंग उपस्थित होते. असा उल्लेख नामदेव महाराजांचे अभंगात येतो.

त्यामुळे परंपरेप्रमाणे प्रतिवर्षी कार्तिक पौर्णिमे दिवशी नामदेव महाराजांचे आणि पांडुरंगाच्या पादुका पंढरपुरातून आळंदीकडे पायी वारीसाठी निघतात. तब्बल दहा दिवसांचा पायी प्रवास करत या पादुका आळंदीमध्ये एकादशीपूर्वी पोहोचणार आहेत. यासाठी मंदिरातून पालखी सोहळा पादुका आळंदी कडे मार्गस्थ झाल्या. Departure of Panduranga to Alandi for Samadhi ceremony

ML/KA/PGB
27 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *