नागरिकांना सोयी सुविधा मिळणे हे आमचे परम कर्तव्य
मुंबई, दि १५
नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या सोयी सुविधा मिळवून देणे हे आमचे परम कर्तव्य असून त्यासाठीच आम्ही काम करत आहोत असे जाहीर प्रतिपादन शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी शिवडी बस डेपो येथील आपला दवाखाना जवळील परिसरातील शौचालयाचे उद्घाटनाप्रसंगी केले. ते पुढे म्हणाले
स्वच्छता व आरोग्य सेवा मजबूत करणे हे आमचे ध्येय असून यासाठीच आम्ही संपूर्ण मुंबईमध्ये स्वच्छ धोरण राबवत आहोत. शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ध्येय धोरणावर आम्ही चालत असून समाजातील लोकांचा आणि परिसराचा विकास करणे हे आम्ही प्रथम कर्तव्य समजतो.
नागरिकांना त्यांच्या सोयी सुविधा तसेच त्यांचा कामाची पूर्तता करून त्यांना शौचालय उपलब्ध करून देणे. याबाबत आमच्याकडे अनेक वेळा लोकांनी निवेदन देऊन सूचना केली होती त्यानुसार आम्ही या ठिकाणी नवीन शौचालयाचे उद्घाटन करत असून यापुढे देखील आम्ही विविध सामाजिक आणि लोकोपयोगी कामाची उर्दूला करत राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक राम बच्चन मुराई यांनी दिली.
यावेळी शिवसेनेचे शिवडी विभाग प्रमुख नाना आंबोले, महिला विभाग प्रमुख अनुराधा इनामदार, बाळा चौफेकर आणि इतर सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.KK/ML/MS